रत्नागिरी : फिनेल प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

Aug 2, 2024 - 10:52
 0
रत्नागिरी : फिनेल प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : आजाराला कंटाळून राहत्या घरी फिनेल प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार ३१ जुलै रोजी दुपारी २.४५ वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. अमोल अनंत कांबळे (४४, रा. बौध्दवाडी कोतवडे, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. 

अमोल कांबळे हे मधुमेह आणि प्यानक्रिया आजाराने त्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी राहत्या घरी फिनेल प्राशन केले होते. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना सायंकाळी ६.१३ वा. त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow