चिपळुणातील तिघींची साउथ एशियन म्युझिक अँड डान्स स्पोर्ट कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Aug 3, 2024 - 10:29
Aug 3, 2024 - 12:45
 0
चिपळुणातील तिघींची साउथ एशियन म्युझिक अँड डान्स स्पोर्ट कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

चिपळूण : श्रीलंका येथे होणाऱ्या एशियन गेम्सअंतर्गत साउथ एशियन म्युझिक अँड डान्स स्पोर्ट कप या स्पर्धेसाठी खेर्डी येथील प्रगती पवार हिच्यासह ६ ते ८ वयोगटात सिया विक्रांत शिर्के, रियांसी बळीराम दांडेकर या तिघींची भारतीय संघात निवड झाली. प्रगती दहा वर्षांखालील सोलो प्रकारात फिल्मी हिंदी गीतांमध्ये ती सहभागी होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी तिचा सत्कार केला.

म्युझिक अँड डान्स स्पोर्टची मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत प्रगती पवार हिला कांस्यपदक मिळाले होते. नेपाळ काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चौथी माउंट एवरेस्ट म्युझिक अँड डान्स स्पोर्ट स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते. केवळ वयाच्या आठव्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले. 

श्रीलंका येथे कैंडी शहरात १० ऑगस्टला साउथ एशियन म्युझिक अँड डान्स स्पोर्टस् स्पर्धा होत आहे. सध्या प्रगती ही खेर्डी येथील मेरी माता स्कूलमध्ये तिसरीत शिकत आहे. या जागतिक स्पर्धेत प्रगती पवार हिची निवड झाल्याने तिचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी सत्कार करत जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिला म्युझिक आरटीएमचे सौम्या सोनी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow