रत्नागिरी : जिल्ह्यात स्वच्छता चळवळ- १,१२० गावे ओडीएफ प्लस

Aug 2, 2024 - 16:58
Aug 2, 2024 - 17:13
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात स्वच्छता चळवळ- १,१२० गावे ओडीएफ प्लस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात स्वस्त चळवळ गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील गाडे हागणदारी मुक्त होण्यासोबत गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५३३ गावार्षिकी १ हजार १२० गावे ओडीएफ प्लस घोषित करण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, १ हजार ५३३ महसुली गावे आहेत यामधील आतापर्यंत १ हजार १२० गावे ओडीएफ प्लस झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या च हागणदारीमुक्त झाल्याचे निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील गावांना 'ओडीएफ प्लस'चा दर्जा देण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग अंतर्गत ओडीएफ प्लस अंतर्गत जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. ओडीएफ प्लसमध्ये वैयक्तिक शौचालय बंधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वती राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाल अंगणवाडी तसेच सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, गाव स्वच्छ ठेवणे आदी कामे करण्यात आली. जिल्हातील सर्व गावांनी हागणदारीमुक्ल अधिक म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

ओडीएफ प्लस अंतर्गत करण्यात आलेली कामे
 घराघरात शौचालयांचे बांधकामे.
 शाळा अंगणवाड्यांमध्ये शौचालय बांधकाम. 
 पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालये. 
 घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत विविध कामे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:24 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow