Paris Olympics 2024 : मनू हॅटट्रिक मारणार? आणखी एका फायनलमध्ये खेळणार

Aug 2, 2024 - 17:05
 0
Paris Olympics 2024 : मनू हॅटट्रिक मारणार? आणखी एका फायनलमध्ये खेळणार

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला पहिले पदक जिंकून देणारी मनू भाकर... मनू भाकरने रविवारी कांस्य पदक जिंकले. मग सरबोजत सिंगच्या साथीने आणखी एका कांस्य पदकाची कमाई करून तिने ऐतिहासिक कामगिरी केली.

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. यात आता आणखी भर पडली असून, मनू भाकरकडे पदकांची हॅटट्रिक मारण्याची संधी आहे. मनूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मनू भाकर शुक्रवारी २५ मीटर पिस्तूल प्रकारात फायनलसाठी पात्र ठरली. उद्या शनिवारी दुपारी १ वाजता ती फायनलमध्ये खेळेल. तीन फायनलसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बनून मनू भाकरने इतिहास रचला.

दरम्यान, मनू भाकरने या आधी दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. नेमबाज सरबजोत सिंग आणि मनू भाकर या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर निशाणा साधला. ऑलिम्पिक म्हणजे खेळाडूंसाठी स्वत:ची एक ओळख बनवण्याचे मोठे व्यासपीठ असते. रविवारी वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर मनूने आणखी एक कमाल केली. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत सरबजोत सिंग-मनू भाकर जोडीने कांस्य पदक पटकावले. त्यामुळे ती आता आणखी एक पदक जिंकून हॅटट्रिक करते का हे पाहण्याजोगे असेल.

मनू भाकरची ऑलिम्पिकमधील कामगिरी
१० मी. महिलांच्या पिस्तूल गटात - कांस्य
१० मी. मिश्र गटात - कांस्य
२५ मी. महिलांच्या पिस्तूल गटात - फायनलमध्ये प्रवेश

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow