कै सदानंद साळवी स्मृतिदिन सामाजिक उपक्रमात गुरुवर्य अ.आ.देसाई विद्यामंदिर हातखंबा आणि पाली मराठा मंदिर शाळा यांना मराठा मंडळ रत्नागिरी यांचेकडून 10 हजार रुपये देणगी
रत्नागिरी : अटल ट्रीकिंग लॅब च्या माध्यमातून या विद्यालयातील श्री नदाफ सर यांनी डिजिटल डस्टबिन व घाटातील वळणावर अपघाताचे वाढते प्रमाण या विषयावरती अखिल भारतीय स्तरावरती प्रोजेक्ट सादर केला. संपूर्ण देशातून पाचशे प्रोजेक्ट निवडले गेले. त्यामध्ये या विद्यालयातील प्रोजेक्टची निवड झाली आहे.
त्याबद्दल कै.सदानंद साळवी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये कॅप्टन प्रमोद साळवी यांच्या हस्ते पाच हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस मुंबई येथील श्रीमती वैशाली विलास सावंत यांनी पुरस्कृत केले होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब धोंगडे, प्रोजेक्ट प्रमुख श्री नदाफ सर कुराडे सर, जेष्ठ शिक्षक कुमार चव्हाण सर, श्री उनउणे सर, उपस्थित होते. त्याच प्रमाणे पाली येथील मराठा मंदिर जुनिअर कॉलेज मधील गरीब विदयार्थी मुलांनाही शालेय साहित्य साठी श्रीमती वैशाली सावंत यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली. शाळेच्या प्राध्यपिका सौ अनुषा सावंतदेसाई मॅडम यांनी क्रांती साळवी यांच्या हस्ते ही देणगी स्वीकारली.
या कार्यक्रमासाठी मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष व या विद्यालयाचे हितचिंतक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सुनील देसाई (आप्पा )व मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर चव्हाण साहेब व कॅप्टन प्रमोद साळवी व त्यांचा परिवार, प्रा चंद्रमोहन देसाई, मराठा मंडळाचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 23-08-2024
What's Your Reaction?