लवेल येथील पेट्रोल पंपचालकाची ४,६४० रुपयांची फसवणूक

Aug 3, 2024 - 12:25
 0
लवेल येथील पेट्रोल पंपचालकाची ४,६४० रुपयांची फसवणूक

खेड : तालुक्यातील लवेल येथे दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी वाजता अथर्व पेट्रोल पंप येथे तीन अज्ञात व्यक्तींनी पंपचालकाची ४ हजार ६४० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दि.१ रोजी सायंकाळी ६.४१ वाजता खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील लवेल येथील अथर्व ऑटोमोबाईल पंपाचे मॅनेजर पद्माकर बाळ गुरव (वय ४७, रा. खेडी माळेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजता अथर्व पेट्रोलपंप येथे तीन अनोळखी इसम एक्स.यू.व्ही. ७०० ही पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक (एमएच ०४ एलएल २००५) घेऊन आले व तेथे काम करणारी आरती दीपक पडवेकर हिला गाडीची डिझेल टाकी फुल करण्यास त्यांनी सांगितली, त्याप्रमाणे गाडीमध्ये ५०.३० लिटर डिझेल भरल्यानंतर या गाडीमधील चालकाने शेजारी बसलेल्या व्यक्तीने, तुमची डेन्सिटी दिसत नाही, असे सांगितले. त्यावेळी मॅनेजर गुरव यांनी पुढे येऊन डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. अपडेट झालेला नाही, त्यामुळे मीटरला कनेक्ट असलेली अॅटोमशीन सिस्टीम तुम्हाला दाखवतो. तुम्ही भरलेल्या डिझेल पंपातून डिझेल काढून त्याची प्रत्यक्षात डेन्सिटी दाखवितो, असे सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु संशयित आरोपी हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर यातील गुरव यांनी संशयित आरोपी याचे फिल्ड ऑफिसर यांच्याशी बोलणे करून दिले व गाडीमध्ये भरलेल्या डिझेलचे ४ हजार ६४० रुपये रकमेची संशयित व्यक्तीकडे मागणी केली असता, त्याने गुरव यांच्यासोबत हुज्जत घालून डिझेल भरलेले पैसे न देता ते गाडी घेऊन मुंबई बाजूकडे निघून गेले, असे तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी तिन्ही संशयित यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow