चिपळूणमधून सदानंद चव्हाण यांना उमेदवारी द्यावी : तालुकाप्रमुख संदेश आयरे

Aug 3, 2024 - 11:48
Aug 3, 2024 - 16:50
 0
चिपळूणमधून  सदानंद चव्हाण यांना उमेदवारी द्यावी : तालुकाप्रमुख संदेश आयरे

चिपळूण : शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण यांनी चिपळूण मतदार संघात दहा वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. गतनिवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्याची भावना आहे. चिपळूण मतदार संघावर शिवसेनेचा दावा आहे. त्यासाठी येथून सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे तालुकाप्रमुख संदेश आयरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना शिंदे गटाच्या तालुका कार्यकारीणीची बैठक बहादुशेखनाका येथील पुष्कर सभागृहात झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख संदेश आयरे व पदाधिकारी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सदानंद चव्हाण हे गुहागरमधून विधानसभा लढणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र तशी परिस्थिती नाही. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघातूनच निवडणूक लढवावी, अशी आमची मागणी आहे. चव्हाण यांनीच चिपळूण तालुक्यातील शिवसेनेला उभारी देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना दोनवेळा आमदारकीची संधी मिळाली. गत निवडणूकीत मात्र त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला. महायुतीत विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळेल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र चिपळूणची जागा शिवसेनेला मिळावी, असा आमचा आग्रह राहणार आहे. माजी आमदार चव्हाण यांचा मतदार संघात चांगला संपर्क आहे. चव्हाण यांनी ही निवडणूक लढवावी, अशी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकत्यांची भावना आहे.

यापार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवसैनिकांचा ६ रोजी निर्धार मेळावा आयोजित केला आहे. बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात हा मेळावा होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:15 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow