राजापूर : श्री देव धुतपापेश्वरला आज गंगाजलाचा अभिषेक

Aug 5, 2024 - 10:53
 0
राजापूर :  श्री देव धुतपापेश्वरला आज गंगाजलाचा अभिषेक

राजापूर : शिमगोत्सवामध्ये आगमन झालेल्या गगंमाई उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री सुमारे १३२ दिवस वास्तव्यास आहे. या कालावधीमध्ये लाखो संख्येने आलेल्या भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधण्याची संधी मिळाली. गंगामाई आणि श्रीदेव शंकराचे अतूट नाते मानले जाते. व्रतवैकल्यांचा मास म्हणून ओळखला जात असलेल्या श्रावण महिन्याच्या सोमवारी गंगाजलाने श्रीदेव धूतपापेश्वरला अभिषेक घालण्याला विशेष महत्व आहे. गंगामाईच्या वास्तव्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातील सोमवारी श्री देव धुतपापेश्वरला गंगास्नानाचा अभिषेक करण्याची पर्वणी भाविकांना साधता येणार आहे.

आगमनापासून गंगामाई आजपर्यंत अखंडीतपणे प्रवाहित आहे. सद्यःस्थितीमध्ये मूळ गंगेसह चंद्रकुंड, सूर्यकुंड, बागकुंड, यमुनाकुंड, सरस्वतीकुंड, गोदावरी कुंड, अग्नीकुंड, भीमाकुंड, चंद्रभागाकुंड पाण्याने भरती आहेत. काशी कुंडातील पाणी गोमुखातून प्रवाहित आहे. मात्र, पावसाळ्याचा शुभारंभ, अतिवृष्टी आणि त्यामध्ये सुरू झालेला शेती हंगाम यामुळे गंगास्नानी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. गंगामाई आणि श्रीदेव शंकराचे अतूट नाते मानले जाते, व्रतवैकल्पांचा मास म्हणून ओळखला जात असलेल्या श्रावणाच्या सोमवारी गंगाजलाने श्रीदेव धूतपापेश्वरला अभिषेक घालण्याला महत्व आहे. त्यामध्ये गंगा स्नानानंतर आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव धूतपापेश्वरांचे दर्शन घेऊन गंगाजल आणि धोपेश्वर येथील मूडानी नदीच्या कोटीतीर्धातील पाणी घेवून श्री धूतपापेश्वरांच्या पिंडीवर अभिषेक केला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow