रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

Aug 5, 2024 - 16:35
Aug 5, 2024 - 16:52
 0
रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, श्री राधाकृष्ण मंदिर, रत्नागिरी येथे दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत श्री राधाकृष्ण चषक या नावाने रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२४-२५ आयोजित करण्यात आलेली आहे. 

हि स्पर्धा १) पुरुष एकेरी, २) पुरुष दुहेरी, ३) महिला एकेरी, ४) व्ययस्कर गट पुरुष, ५) कुमार गट, ६) कुमारी गट ७) किशोर गट व ८) किशोरी गट अश्या आठ गटात खेळवली जाणार आहे. या वर्षातील हि तिसरी स्पर्धा आहे. 

जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्या खेळाडूंनी २०२४-२५ या वर्षाची रजिस्टेशन फी रुपये ५०/- जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी रुपये १५०/- दुहेरीसाठी रुपये २००/- व लहान गटासाठी रुपये १००/- याप्रमाणे येईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. 

सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित ‌द्याव्यात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टी शर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी.

तालुका प्रतिनिधी खालील प्रमाणे:

१) गुहागर - श्री प्रदीप परचुरे (९४२३०४८२५० ) 
२) रत्नागिरी - श्री विनायक जोशी (८३९०३८७४८३)
३) देवरूख - श्री राहुल भस्मे (९६५७६३७६७८)
४) चिपळूण - श्री साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), श्री दीपक वाटेकर (९९७५५४६६२५ )
५) संगमेश्वर - श्री मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५ )
६) लांजा – श्री मनोज जाधव (७६२०११६७३६ )
७) खेड - श्री योगेश आपटे (९९५३२२२६३१)
८) राजापूर - श्री मनोज सप्रे (९४०३७६८३७६ )

सदर स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून श्री विनय गांगण व श्री सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून श्री. सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन श्री राजन मलूष्टे - अध्यक्ष श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, श्री मकरंद खातू - सचिव श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, श्री प्रदीप भाटकर - अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री सुरेंद्र देसाई - उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री सुचय अण्णा रेडीज - सल्लागार रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री मिलिंद साप्ते - सचिव रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, सचिन बंदरकर राष्ट्रीय पंच यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow