मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी उत्साहात

Aug 5, 2024 - 17:32
 0
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी उत्साहात

◼️ एस. पी. हेग शेट्ये महाविद्यालयात आयोजन; अंतिम फेरी २८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरमध्ये विद्यापीठात होणार

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) येथील एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उत्साहात पार पडली. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांतील १७ महाविद्यालयातून जवळपास ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. 

प्राथमिक फेरीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. नीलेश सावे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, सह समन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. 

प्राथमिक फेरीचा बक्षीस समारंभ गोगटे-जोगळेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पटवर्धन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मधुरा पाटील, संगमेश्वर नवनिर्माण कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, नवनिर्माण नर्सिंग कॉलेज, लोवलेच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून, युवा महोत्सवाची अंतिम फेरी २८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबई विद्यापीठात होणार आहे. 

यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल असा : भारतीय शास्त्रीय गायन (एकल) : गोगटे - जोगळेकर कॉलेज (रत्नागिर), कीर लॉ कॉलेज (रत्नागिरी). शास्त्रीय वाद्य (एकल) तालवाद्य : गोगटे-जोगळेकर कॉलेज. शास्त्रीय वाद्य (एकल) स्वरवाद्य : गोगटे -जोगळेकर कॉलेज, उत्तेजनार्थ - कीर लॉ कॉलेज, फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिर). इंडियन लाईट वोकल (एकल) : आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज (देवरुख). भारतीय समूह गायन :  गोगटे-जोगळेकर कॉलेज, कीर लॉ कॉलेज. पाश्चात्य समूह गायन : गोगटे-जोगळेकर कॉलेज, कीर लॉ कॉलेज. पाश्चात्य गायन (एकल) : गोगटे-जोगळेकर कॉलेज. नाट्यसंगीत गायन (एकल) : गोगटे-जोगळेकर कॉलेज, फिनोलेक्स अकॅडमी. भारतीय शास्त्रीय नृत्य : गोगटे-जोगळेकर कॉलेज, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट (देवरुख). भारतीय लोकनृत्य : आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, संगमेश्वर नवनिर्माण कॉलेज, एस. पी. हेगशेट्ये कॉलेज (रत्नागिरी), उत्तेजनार्थ - गोगटे-जोगळेकर कॉलेज. वक्तृत्व स्पर्धा (मराठी) : कीर लॉ कॉलेज, एस. पी. हेगशेट्ये कॉलेज आणि गोगटे-जोगळेकर कॉलेज (विभागून दुसरा), कला, वाणिज्य आणि विज्ञान लांजा कॉलेज, उत्तेजनार्थ - भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सीनियर कॉलेज (रत्नागिरी). वक्तृत्व स्पर्धा (इतर भाषा) : गोगटे-जोगळेकर कॉलेज, उत्तेजनार्थ - राजेंद्र माने इंजिनीअरिंग कॉलेज (आंबव, देवरुख), कीर लॉ कॉलेज. वादविवाद स्पर्धा (मराठी) : कीर लॉ कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज, भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. वादविवाद स्पर्धा (इतर भाषा) : गोगटे-जोगळेकर कॉलेज, कीर लॉ कॉलेज. कथाकथन स्पर्धा (मराठी) : कीर लॉ कॉलेज,  एस. पी. हेगशेट्ये कॉलेज आणि आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज (विभागून दुसरा), लांजा कॉलेज आणि आबासाहेब मराठे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, राजापूर (विभागून तिसरा). कथाकथन स्पर्धा (इतर भाषा) : कीर लॉ कॉलेज, भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, राजेंद्र माने इंजिनीअरिंग कॉलेज आणि आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज (विभागून तिसरा). एकपात्री अभिनय (मराठी) : एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज, लोकनेते शामरावजी पेजे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज (शिवार आंबेरे). एकपात्री अभिनय (इतर भाषा) : गोगटे-जोगळेकर कॉलेज. स्किट (मराठी) : गोगटे- जोगळेकर कॉलेज, फिनोलेक्स अकॅडमी. स्किट (इतर भाषा) : एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज. मोनो अक्टिंग (मराठी) : एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज. मोनो अक्टिंग (इतर भाषा) : कीर लॉ कॉलेज, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज. नाटक (माईम) : एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज, फिनोलेक्स अकॅडमी. नाटक (मिमिक्री) : उत्तेजनार्थ - आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज. ऑन दी स्पॉट पेंटिंग : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइनिंग, कीर लॉ कॉलेज, मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट. फाईन आर्ट : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइनिंग, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज. फाईन आर्ट - पोस्टर मेकिंग : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज, उत्तेजनार्थ - राजेंद्र माने इंजीनियरिंग कॉलेज, कीर लॉ कॉलेज. फाईन आर्ट -  मातीकाम : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, उत्तेजनार्थ - गोगटे-जोगळेकर कॉलेज. फाईन आर्ट - व्यंगचित्र : आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, राजेंद्र माने इंजिनियरिंग कॉलेज, उत्तेजनार्थ - गोगटे-जोगळेकर कॉलेज. 

फाईन आर्ट - रांगोळी : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, कीर लॉ कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज, उत्तेजनार्थ - आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज. फाईन आर्ट - मेहंदी डिझाईन : लांजा कॉलेज, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज आणि गोगटे-जोगळेकर कॉलेज (विभागून दुसरा), एस. पी. हेगशेट्ये कॉलेज आणि संगमेश्वर नवनिर्माण कॉलेज (विभागून तिसरा), उत्तेजनार्थ - देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow