Breaking : रत्नागिरी : डीझेल संपल्याने प्रवासी खोळंबले, एसटी अधिकारी नॉट रिचेबल
*रत्नागिरी :* रत्नागिरी डेपोतील डीझेल संपल्याने एसटी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याने काहीच माहिती प्रवासी वर्गाला मिळत नाही आहे. शाळा व ऑफिस सुटल्यावर शेकडो शालेय विद्यार्थी आणि कर्मचारी बस स्थानकात वाट पहात बसल्याचे चित्र आहे. डीझेल संपल्याने हि वाहतूक बंद झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड संताप आहे. लांबून येणाऱ्या शाळकरी मुलांना देखील यामुळे बस स्थानकावर वाट पहात उभे राहावे लागत आहे. एसटी वाहतूक पूर्ववत केव्हा होणार याची माहिती देखील मिळत नसल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
19:06 05-08-2024
What's Your Reaction?