Bangladesh Violence : आंदोलकांनी लुटलं शेख हसीनांचं घर
ढाका : बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी देशही सोडला आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या ढाक्यातील निवासस्थानी आंदोलक घुसले आणि त्यांनी तोडफोड केली.
या तोडफोडीवेळी आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातीत अनेक वस्तू पळवून नेल्या. आंदोलकांनी चोरलेल्या वस्तू नेण्यासाठी खास हातरिक्षा मागवल्या होत्या. त्यामध्ये बसतील तेवढ्या वस्तू ठेवल्या आणि त्या घरी नेल्या.
आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातील स्वयंपाकघरातील खाण्याच्या अनेक वस्तूंवर डल्ला मारला, अनेकांनी चिकन मटणवर तावदेखील मारला.
आंदोलकांनी घरातील अनेक वस्तू पळवून नेल्या. फक्त वस्तूच नव्हे तर आंदोलकांनी घरातील बकरी, कोंबड्याही नेल्या.
एका आंदोलकाने बकरी उचलली तर एका आंदोलकाने बदक उचलून नेलं.
एका महिला आंदोलकाने शेख हसीना यांच्या घरातील बॅग उचलून नेली.
एका आंदोलकाने शेख हसीना यांच्या घरातील घड्याळ आणि एसी, कुलरसह अनेक वस्तूंवर डल्ला मारला.
एका आंदोलकाने तर शेख हसीना यांच्या घरातील मासाही उचलून नेला.
तर एका आंदोलकाने पाळीव ससा उचलून नेला.
एका आंदोलकाने टीव्ही उचलला आणि डोक्यावर ठेऊन तो घरी नेला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 06-08-2024
What's Your Reaction?