रत्नागिरी नगर परिषदेकडून झाडी-झुडपे छाटण्याचे काम सुरू

Aug 6, 2024 - 11:08
 0
रत्नागिरी नगर परिषदेकडून झाडी-झुडपे छाटण्याचे काम सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने शहरातील झाडी-झुडपे छाटण्याचे आणि बेणनीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आता मच्छरांचा उपद्रव कमी होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी द्रवरूप फवारणी आणि धुरीकरणही करण्यात आले आहे.
पावसाळ्यात शहरात सर्वत्र रानटी झाडे-झुडूपे उगवतात. त्यामुळे डास पैदास होण्यास मदत होते. यावर उपाय म्हणून दरवर्षी बेणनी केली जाते. हे काम आता शहरातील सर्व रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे-झुडूपे तसेच गल्लीबोळाच्या ठिकाणी सुरू झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी ही सर्व स्वच्छता पूर्ण होईल, असे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील बेणनीच्या कामासाठी तीस कामगारांना कटर देण्यात आले आहेत. सफाई कामगार पंधरा कटरच्या मदतीने ही बेणनी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow