रत्नागिरी : भगवा सप्ताहांतर्गत ठाकरे शिवसेनेच्या आजपासून बैठका

Aug 6, 2024 - 11:21
 0
रत्नागिरी : भगवा सप्ताहांतर्गत ठाकरे शिवसेनेच्या आजपासून बैठका

रत्नागिरी : अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सक्रिय झाला आहे. भगवा सप्ताहांतर्गत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मंगळवारपासून (ता. ६) जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचा धडाका सुरू करण्यात येणार आहे. माजी खासदार विनायक राऊत या बैठकांना उपस्थिती लावणार आहेत. या बैठकांची सुरवात नाचणे येथून केली जाणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का बसला, मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी पुन्हा मतदारसंघात जोमाने कामाला सुरुवात केली.

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे ठाकरे गटाकडून तयारीला सुरवात झाली आहे. त्यासाठी ठाकरे सेनेने भगवा सप्ताहांतर्गत पुढील चार दिवसांत जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राजापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला भरभरून मते मिळाली होती. या तिन्ही जागांवर आघाडी तगडे आव्हान निर्माण करण्याची तयारीत आहे. नाचणे, हरचिरी येथे मंगळवारी बैठका होतील. ७ ऑगस्टला कोतवडे, करबुडे, ८ ला गोळप, पावस, ९ ला मिरजोळे, शिरगाव, १० ला हातखंबा आणि ११ ला वाटद येथे समारोप होईल.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 06-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow