लांजा-राजापूर मतदार संघात महायुतीचाच उमेदवार : अजित यशवंतराव

Aug 6, 2024 - 12:11
 0
लांजा-राजापूर मतदार संघात महायुतीचाच उमेदवार :  अजित यशवंतराव

लांजा : कोणी कितीही जोर लावू द्या, कितीही विरोध करू द्या त्याचा काहीच फरक पडणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी लांजा-राजापूर मतदार संघात महायुतीचाच उमेदवार असणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच कामाला लागा, अशा सूचना सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी लांजा येथे कार्यकर्त्यांना केल्या. 

लांजा शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित यशवंतराव कार्यकर्त्यांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, योगेश वाघधरे, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दळवी, शहराध्यक्षा मानसी कोपरे, शहर अध्यक्ष प्रमोद आग्रे, युवक शहर अध्यक्ष दिपक शेट्ये, युवक क्षेत्राध्यक्ष राजेश झोरे, उपाध्यक्ष विकास चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुक लक्षकेंद्री करून मार्गदर्शन करताना अजित यशवंतराव बोलताना पुढे म्हणाले की, लांजा-राजापूर विधानभा क्षेत्रातील जनतेशी कायम बांधिलकी जोपासली आहे. विधानसभा क्षेत्रातील गावांचा विकास साधने हेच माझे लक्ष आहे, असे शेवटी अजित यशवंतराव म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow