रत्नागिरी : 'निवडणुकी'तून ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना वगळा; कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी

Aug 29, 2024 - 11:00
Aug 29, 2024 - 11:05
 0
रत्नागिरी : 'निवडणुकी'तून ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना वगळा; कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५५ वर्षावरील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना निवडणूक कामगिरीतून वगळण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, सद्यःस्थितीत ५५ वर्षांपुढील अधिकारी/कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे त्यांच्याकडे ग्रासलेला आहे. त्याच्या वैयक्तिक व असलेल्या जादा कामगिरीमुळे शासकीय अडचणीमुळे तो शारीरिकदृष्ट्या ब्लडप्रेशर व मधुमेहाने त्रासलेला असल्याचे निर्दशनास येत आहे.

कामाच्या ताण-तणावामुळे त्यांची काम करण्याची मनस्थिती खचलेली, शरीराने खंगलेली दिसते, अशा परिस्थितीत निवडणूक कामात काही चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व कारणांमुळे वय वर्षे ५५ वरील अधिकारी/कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना येणाऱ्या निवडणूक कामगिरीतून वगळण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow