राजस्थानातील तरुणाचा रुग्णालयात मृत्यू
रत्नागिरी : उलटीचा त्रास होऊन आजारी पडलेल्या राजस्थान येथील तरुणाचा कराड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना १७ जून रोजी पहाटे ३.२९ वा. घडली आहे. देवाराम बाबुराम देवासी (३०, मुळ रा. राजस्थान सध्या रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जून महिन्यात देवारामला उलटीचा त्रास होउ लागल्याने त्याला बेशुध्दावस्थेत रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून पुढील उपचारांसाठी त्याला कराड येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज घेउन जात असताना त्याला पुन्हा त्रास हाऊ लागल्याने त्याला पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवारामला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 07-08-2024
What's Your Reaction?