अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात सकाळपासूनच भाविकांची रीघ

Jun 25, 2024 - 09:49
 0
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात सकाळपासूनच भाविकांची रीघ

रत्नागिरी : अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली असून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा आहेत.
 
दिवसभरामध्ये लाखो भाविक बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान करण्यात आले आहेत. गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया असा नामघोष करत पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरात दिसून येते.
 
होणारी गर्दी पाहता चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. पावसाळा असला तरी भाविकांमधला उत्साह कायम आहे.
 
अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात आलेल्या भाविकांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जात आहे. राज्यातील विविध संस्था आणि मंडळांकडूनच प्रसादाचं मोफत वाटप केलं जात आहे. साबुदाणा खिचडी, केळी, वेफर्स, राजगिरा लाडू आणि जोडीला चहाचं मोफत वाटप भाविकांना केलं जात आहे.
 
नारळ, दुर्वा, फुलांची परडी घेऊन भाविक दर्शनाला येत आहेत. गणपतीपुळ्यात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांची पावलं समुद्रकिनारी वळत आहेत. समुद्रात डुंबण्याचा आनंद भाविक घेत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात समुद्राला उधाण आल्यामुळे समुद्रामध्ये प्रवेश करू नये, काळजी घ्यावी, असे सतर्कतेचे फलक किनारी लावण्यात आलेले आहेत.


 
समुद्राची धोक्याची पातळी लक्षात घेता जीवरक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. समुद्रकिनारी अगदी सकाळपासूनच भाविकांनी फुलले आहेत. मोठ्या लाटा उसळत असल्याने भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow