तोणदे शाळेत दीप अमावास्या साजरी

Aug 7, 2024 - 11:46
 0
तोणदे शाळेत दीप अमावास्या साजरी

रत्नागिरी : आषाढ अमावास्या अर्थात दीप अमावास्येबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत दीप अमावास्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दीप अमावास्येचे महत्त्वही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

आपले सण हे विज्ञानाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे अशा परंपरांचे आपण जतन केले पाहिजे. सणांमध्ये आलेले विकृतीकरण थांबले पाहिजे, या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विद्यार्थ्यांना समई, निरांजन, सौरदिवा, कंदील, सौर कंदील, मशाल, गॅसबत्ती, लामण दिवा, रॉकेलचा दिवा, आकाश कंदील, सेलवरची विजेरी इत्यादी पारंपरिक व आधुनिक दिव्यांची ओळख करून देण्यात आली.

या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow