कर्तव्य पार पाडूनच आईवर अंत्यसंस्कार; एसटी चालकाची बांधिलकी

Aug 7, 2024 - 14:02
Aug 7, 2024 - 14:05
 0
कर्तव्य पार पाडूनच आईवर अंत्यसंस्कार; एसटी चालकाची बांधिलकी

चिपळूण  : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील सुशील उदगावे हे एसटी महामंडळात चालक आहेत. रविवारी सकाळी त्यांची आई नकुशी दिलीप उदगावे (वय ६७) यांचे निधन झाले. या वेळी सुशील हे चिपळूण ते मुंबई मार्गावर आपली सेवा बजावत होते. त्याचवेळी त्यांना आईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समजली. त्यांनी आपल्या दुःखाला आवर घालत प्रवाशांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवून मगच आईच्या अंत्यसंस्काराला गेले.

चिंचवाड येथील सुशील उदगावे वर्षभरापासून एसटी महामंडळामध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. रविवारी सकाळी अचानक त्यांच्या आईचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधनाचे वृत्त त्यांना समजताच ते मुंबईहून चिपळूणला एसटी घेऊन जात होते. डोळ्यांतून वाहणारे पाणी आणि येणारे हुंदके थांबत नव्हते तरीही त्यांनी आपली एसटी सेवा बजावण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक थांबा घेत प्रवाशांना घेऊन चिपळूण गाठले. प्रवाशांना सुखरूप पोहोच करून गावी परतीचा प्रवास चालू केला. दरम्यान, चिंचवाड येथे नातेवाईकांनी आईचा मृतदेह आठ तास घरी ठेवून एकुलत्या एक मुलाची वाट पाहिली. सुशील घरी आल्यानंतर त्यांनी आईच्या चितेला अग्नी दिला. परिवारावर दुःखाचे संकट आले असतानाही प्रथम सेवेला प्राधान्य देत आपले कर्तव्य बजावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow