खेड : सोनगाव हद्दीतील भोई समाजाचा स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा

Aug 7, 2024 - 13:56
 0
खेड : सोनगाव हद्दीतील भोई समाजाचा स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा

चिपळूण : शासनाकडून राबवण्यात येणारी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा येणारा निधी ग्रामपंचायत सोनगाव या हद्दीत असणारे भोईवाडी हे दुर्लक्षित वस्तीतील ग्रामस्थांनी खूप वर्ष पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे येथील भोई समाज आंदोलनाच्या तयारीत आहेत.

विमुक्त जाती व भटक्या जमाती समूहांचे तांडे वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हेतू आहे. परंतु अशा दुर्लक्षित विमुक्त जाती व भटक्या जमातींना कागदोपत्री पाठपुरावा करून देखील जर समाजापासून वंचित राहिलेल्या लोकांना मिळत नसेल तर अशा योजनांचा काय फायदा, असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रस्तावास शासनाने २०१८- १९ ते २०२२-२३ चा आराखडा तयार केला असून या पाच वर्षांमध्ये ६० लाख रुपये खर्च करायचे तरतूद शासनाकडून झालेली होती. यामध्ये दोन वर्षाचा कोरोना काळ वगळता उर्वरित तीन वर्षाचा फंड सोनगाव ग्रामपंचायतमध्ये मिळालेला नाही. शासनाने आराखडे तयार करून सोनगाव भोईवाडीतील मागास समाजातील जनतेची एकप्रकारे फसवणूक केलेली आहे, हे या सर्व प्रकरणावरून दिसून येत आहे. शासनाला पत्र व्यवहार करून तसेच योजनेचे प्रस्ताव देऊन सुद्धा या वस्तीत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ झालेला नाही.

या सर्व प्रकरणासाठी सोनगांव भोईवाडीतील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पांडुरंग दिवेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त, रत्नागिरी, आंबेडकर भवन येथे आमरण उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow