निवृत्ती मानधनासाठी अंगणवाडी सेविकेचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

Aug 8, 2024 - 01:34
Aug 8, 2024 - 14:37
 0
निवृत्ती मानधनासाठी अंगणवाडी सेविकेचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

साखरपा : सेवानिवृत्त होऊन आठ वर्षे झाली तरीही निवृत्ती मानधन मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेने स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीपुढे उपोषण करणार असल्याचे सांगितले. 

अंगणवाडी सेविका रेश्मा शंकर अभ्यंकर या २०१६ च्या फेब्रुवारीत निवृत्त झाल्या. आधी युनिसेफअंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत ३५ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर कोंडगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाल्या. अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यावर त्यांना रुपये एक लाखएवढे सेवानिवृत्ती मानधन मिळते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अभ्यंकर यांनी त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्दही केली होती; पण आजतागायत त्यांना हे मानधन मिळालेले नाही. ७२ वर्षीय रेश्मा अभ्यंकर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती येथे त्या उपोषण करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow