वेळीच उपचाराने कुष्ठरोग होतो बरा : प्रफुल्ल केळसकर

Aug 8, 2024 - 10:26
Aug 8, 2024 - 14:35
 0
वेळीच उपचाराने कुष्ठरोग होतो बरा : प्रफुल्ल केळसकर

सावर्डे : कुष्ठरोगाची लक्षणे वेळीच जाणून घेतली व योग्य निदानासह औषधोपचार केले तर कुष्ठरोग पूर्णपण बरा होतो, असे प्रतिपादन पर्यवेक्षक व्याख्याते प्रफुल्ल केळसकर यांनी केले. सह्याद्री शिक्षणसंस्था व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कुष्ठरोग निर्मुलन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी साहाय्यकः रिया जाधव, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. केळसकर म्हणाले, कुष्ठरोगाचे लवकर निदान व नियमित उपचार यामुळे शारीरिक विकृती व विद्रुपता निश्चितपणे टाळता येते. सर्वांच्या सहभागाने कुष्ठरोगाचे निर्मुलनसुद्धा सहजशक्य आहे. कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज घातक असून, त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर वेळेत उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. 

यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढे येऊन संबंधिताला आधार देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगाविषयीच्या विविध प्रश्नांची उकल करून घेतली व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे देऊन या रोगाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी हातभार कसा लावता येतो त्याची माहिती दिली. शाळेतील या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यातील गंभीर आजाराबाबत असणाऱ्या गैरसमज दूर झाले. प्रस्ताविकात प्राचार्य राजेंद्र वारे यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी आयोजित केलेल्या या व्याख्यानाचा उद्देश विषद केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow