मालगुंडमध्ये केशवसुत स्मारकात १० रोजी 'श्रावणधारा' कार्यक्रम

Aug 8, 2024 - 14:38
 0
मालगुंडमध्ये केशवसुत स्मारकात १० रोजी 'श्रावणधारा' कार्यक्रम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड आणि कोमसाप शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे 'श्रावणधारा मनामनांतील' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गोमांतकीय साहित्यिकांच्या सहभागाने सजलेली रत्नागिरीकर आणि गोमांतकीय साहित्यिकांची एक संयुक्त मैफल या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. मैफलीत साहित्य लेणी तिळगाव गोवाचे पोर्णिमा केरकर, प्रकाश क्षीरसागर, आसावरी कुलकर्णी, नंदिनी कुलकर्णी, मेघना कुरुंदवाडकर, सुनिता फडणवीस, किरण कामत, अपूर्वा ग्रामोपाध्ये, दयाताई मीत्रगोत्री, शर्मिला भाटे आदी कवी आपल्या मैफलीचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर रत्नागिरीचे देविदास पाटील, सुनेत्रा जोशी, शुभम कदम, उमा जोशी, अमेय धोपटकर अरुण मोर्ये हे सादरीकरण करणार आहेत. 

यावेळी कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षा नलिनी खेर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रमास रसिक प्रेषक आणि कवी साहित्यिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन आणि कोमसाप शाखा मालगुंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow