घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची 'टीसीएस'मध्ये निवड

Aug 8, 2024 - 14:52
 0
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची 'टीसीएस'मध्ये निवड

खेड : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील ४ विद्यार्थ्यांची टीसीएस या कंपनीमध्ये निवड झाली आहे.

सोहम जाधव, साहील कोकाटे, रोशन जाधव, पूजा खानविलकर या चार विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे.

घरडा महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कैंपस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते. विविध कंपनींमध्ये निवड होण्यासाठी लागणारे प्रशिक्षणदेखील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात देण्यात येते. या आयोजनासाठी महाविद्यालयाचे टीपीओ समीर ताठरे हे कार्यशील असतात.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रशासन प्रमुख कर्नल सिन्हा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, संगणक विभागप्रमुख प्रा. महेश खांडके यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow