रत्नागिरी : पावस परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

Aug 10, 2024 - 11:37
 0
रत्नागिरी : पावस परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक भाग अपघात क्षेत्र बनले आहेत. काही ठिकाणी भात पिकाची नासधूस करत असल्याने जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पावस पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे ४ हजार पाळीव जनावरे आहेत. या जनावरांचा उपयोग शेती आणि दूधासाठी होतो. मात्र, ही गुरे गोठ्यात बांधून ठेवण्याऐवजी मोकाट सोडली जातात. रस्त्यावरच ठाण मांडूण बसल्याने ही गुरे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. त्यांना रस्त्यावरून हटवले तरी पुन्हा तेथे येऊन वाहतूक कोंडी होत आहे. एखाद्या वाहनचालकाने ठोकर दिल्यास संबंधित मालक नुकसान भरपाई करता हजर होतात.

परिसरातील अनेक भागांत भात लावणीची कामे पूर्ण झाल्यानंतर मोकाट जनावरे भात शेतीमध्ये जाऊन त्यांची नासधूस करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे भविष्यात भात शेती करणे धोकादायक ठरणार आहे.

आम्ही मोठ्या कष्टाने भात लावणी करतो. मात्र, मोकाट जनावरे भातपिकाची नासधूस करत असल्यामुळे भात शेती करणे भविष्यात कठीण होणार आहे. - अर्जुन भुते शेतकरी, पावस


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow