रत्नागिरीत उद्या कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा
रत्नागिरी : कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी, लोकनेते श्यामराव पेजे स्मृती न्यास व कुणबी समाज क्रांती संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ११ ऑगस्ट रोजी कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकार नाट्यगृहात होणार असून यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अॅड. सुजित झिमण, सुधाकर मुरकुटे, नंदकुमार मोहिते, सुनील पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी कर्मचारी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष रावणंग यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 10-08-2024
What's Your Reaction?