चिपळूण : डीबीजे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कौशल्य सप्ताह

Aug 10, 2024 - 15:13
 0
चिपळूण : डीबीजे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कौशल्य सप्ताह

रत्नागिरी : चिपळूण येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयात कौशल्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत महिला विकास कक्षाकडून विद्यार्थिनींना जुन्या साड्यांपासून तसेच चिंध्यांचा वापर करून विविध प्रकारच्या कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कौशल्य सप्ताहात विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कापडी पिशव्या तयार करण्याच्या उपक्रमाने त्याचा प्रारंभ झाला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला विकास कक्षप्रमुख प्रा. दिशा दाभोळकर, सदस्य सौ. सिद्धी साडविलकर, सौ. उज्ज्वला कुलकर्णी; सुचिता दामले, सौ. तृप्ती यादव यांनी मेहनत घेतली. प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य नामदेव तळप, पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow