कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाला रत्नागिरी पालकमंत्र्यांकडून साहित्य

Aug 10, 2024 - 15:06
 0
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाला रत्नागिरी पालकमंत्र्यांकडून साहित्य

त्नागिरी : उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाला व्याधीग्रस्त दिव्यांग ज्येष्ठांच्या पुनर्वसनासाठी अत्यावश्यक साहित्य तसेच संघाच्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा वाचनालय कक्षासाठी दोन कपाटे देणगीदाखल दिली.

कुवारबाव गावभेटीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयासाठी कपाटांची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्या सभेत त्यांनी ही कपाटे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे आपल्या वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध विकलांग ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक पुनर्वसनासाठी दोन बेड, दोन व्हील चेअर्स, दोन कमोड खुर्च्या, दोन वॉकर्स आणि एक वॉटर बेड असे साहित्य यापूर्वीच दिले होते. हे साहित्य कुवारबाव येथील कार्यक्रमात त्यांनी संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांच्याकडे सुपूर्त केले. कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाने संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या नावाने वाचन कक्ष सुरू केल्याबद्दल या उपक्रमाचे स्वागत करून संघाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

संघाचे अध्यक्ष अंबरे यांनी पालकमंत्री सामंत यांना त्यांनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक साहित्य आस्थेने उपलब्ध करून देऊन ज्येष्ठांचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow