Paris Olympics 2024 : विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबतचा निकाल सीएएसने ठेवला राखून

Aug 12, 2024 - 11:58
 0
Paris Olympics 2024 : विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबतचा निकाल सीएएसने ठेवला राखून

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटचा (Vinesh Phogat) हिच्या 50 किलो वजनी गटातील अपात्रतेबाबतचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने (सीएएस) पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024)संपल्यानंतर म्हणजेच 13 ऑगस्टपर्यंत (मंगळवार) राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विनेश फोगाटच्यावतीने भारतातील आघाडीचे दोन वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया हे खटला लढवत आहेत. हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया हे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) नियमांच्या आधारे आपली बाजू मांडत असल्याची माहिती समोर येत आहे.

युक्तीवादात नेमकं काय घडलं?

एका अहवालानूसार, UWW केवळ पुस्तकांच्या आधारे खटला लढत आहे. परंतु हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी केवळ नियमांचा विषय नाहीय, तर त्याहून अजून बरेच काही आहे, असा महत्वाचा युक्तिवाद केला. दरम्यान विनेश फोगाटचे वकील भारतीय बाजू कुठेतरी नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहे. सीएएसचा निर्णय विनेश फोगाटच्या बाजूने येण्याची शक्यता खूप जास्त असल्याचेही समोर आले आहे.

निकालाला उशीर का होतोय?

विनेश फोगट प्रकरणाचा निर्णय आधी 10 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता येणार होता. मात्र 10 ऑगस्ट रोजी निर्णयाची तारीख वाढवून 13 ऑगस्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोन्ही पक्षांना काही प्रश्न विचारण्यात आले होते, सीएएसने त्यांची उत्तरे सादर करण्यासाठी 11 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठेवली होती. दोन्ही पक्षांना 11 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंत ई-मेलद्वारे उत्तरे सादर करायची होती.

विनेश फोगाटला विचारले तीन महत्वाचे प्रश्न-

सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची जाणीव होती का? दुसरा प्रश्न रौप्य पदकाशी संबंधित आहे. विनेशला विचारण्यात आले आहे की, क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्य पदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या अपीलचा निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे?, असा सवाल विनेशला विचारल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेने पटकावले सर्वाधिक पदके-

ऑलिम्पिकच्या पदकतालिकेवर नजर टाकल्यास अमेरिका अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेने एकूण 126 पदके जिंकली असून यामध्ये 40 सुवर्णपदक, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदके जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनने एकूण 95 पदके जिंकली आहेत. यामध्ये 40 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक जिंकली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow