आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आता यूएईत होणार

Aug 21, 2024 - 16:53
 0
आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आता यूएईत होणार

आयसीसी महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचा नववा हंगाम आता यूएईत होणार आहे. महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती.

मात्र, तेथील परिस्थिती आणि हिंसाचार यामुळे यूएईत स्पर्धा खेळवण्याचा निर्णय झाला आहे. ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विश्वचषकाचा थरार रंगेल. आयसीसीचे अधिकारी ज्योफ ॲलार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले की, बांगलादेशात महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा होत नाही ही लाजिरवाणी बाब आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने चांगल्या प्रकारे स्पर्धा करण्याचे नियोजन केले होते. पण, दुर्दैवाने ही स्पर्धा इतरत्र हलवावी लागली.

मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सर्व टीमचे आभार मानू इच्छितो. त्यांनी बांगलादेशात ही स्पर्धा भरवण्यासाठी शक्य ती सर्व मदत केली. पण, अनेक सहभागी संघांच्या सरकारने बांगलादेशात स्पर्धा करण्यास नकार दर्शवला. यजमानपद त्यांच्याकडेच असले तरी यूएईत विश्वचषकाचा थरार रंगेल. आगामी काळात बांगलादेशमध्ये आयसीसीची स्पर्धा घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. बीसीबी, श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या वतीने यजमानपदासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी अमिरात क्रिकेट बोर्डाचे आभार मानतो, असेही आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते ICC अध्यक्षपद सोडतील. २०२२ मध्ये बिनविरोध पुन्हा निवडून येण्यापूर्वी बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये 'आयसीसी चेअर' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. खरे तर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत.

विश्वचषकातील भारताचे सामने -
४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड
६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान
९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर १
१३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow