Breaking : काळबादेवी वासियांची घरे जाऊ देणार नाही; त्यांच्यापाठी ठामपणे उभा राहणार - पालकमंत्री उदय सामंत

Aug 13, 2024 - 14:07
Aug 13, 2024 - 14:09
 0
Breaking : काळबादेवी वासियांची घरे जाऊ देणार नाही; त्यांच्यापाठी ठामपणे उभा राहणार - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मुंबई गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून कोकण एक्स्प्रेस हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. एकूण 22 गावांतून हा प्रकल्प जाणार असून यामुळं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण 363 किमी लांबीचा असणार असून सहा मार्गिकांचा आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथपर्यंत जाणार आहे. 

या महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून या मार्गावरील विविध गावातून भूसंपादन मोजणीसाठी आज अधिकारी दाखल झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात मात्र या मोजणीसाठी विरोध करण्यात आलाय. आज सर्व शासकीय यंत्रणा या गावात दाखल होताच येथील ग्रामस्थांनी या मोजणीला संतप्त होत विरोध दर्शवला. येथील शाखा प्रमुख संदेश बनप यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख आबा पाटील यांच्याशी संपर्क साधत सर्व वृत्तांत कथन केला. यानंतर सध्या अमरावती दौऱ्यावर असणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर ही घटना टाकण्यात आली असता त्यांनी तत्काळ ही मोजणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. काळबादेवी वासियांची घरे जाऊ देणार नाही, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

येत्या दोन दिवसात मी रत्नागिरीत आल्यावर याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow