चिपळूण : रामपूर येथे स्वातंत्र्यदिनी रास्ता रोको आंदोलन; आ. भास्कर जाधव करणार नेतृत्व

Aug 14, 2024 - 12:37
Aug 14, 2024 - 15:45
 0
चिपळूण  :  रामपूर येथे स्वातंत्र्यदिनी रास्ता रोको आंदोलन; आ. भास्कर जाधव करणार नेतृत्व

रामपूर : आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने चिपळूण तालुक्यातील रामपुर-पाथर्डी-मिरवणे-गुढे-डुगवे हा रस्ता मार्च २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. परंतु, रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी सातत्याने करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, येत्या १५ ऑगस्ट रोजी या भागातील जनता रामपूर-गुढे फाटा येथे एकत्र येऊन रास्ता रोको करणार आहेत. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व आ. जाधव हे करणार आहेत.

एसटीची वाहतूक बंद
या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला असून एसटी सेवाली बंद आहे. तसेच रिक्षा, दुचाकीवरून वाहतूक करतान्य वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत. मोरेवाडी, कोंडवी, मुढे, डुगचे, ताम्हणमळा, गावठाण, मिरवणे शिरवली, पाथर्डी, उमरोलीला जोडणारा दुसरा मार्ग नसल्याने येधील नागरिकांची गैरसोय होत आहे.

चिपळूण तालुक्यातील रामपूर, पाथर्डी, मिरवणे, गुढे, डुरावे या गावांना जोडणारा हा रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता, परंतु, जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता आणि खर्च करण्यास असलेली मर्यादा यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी आ. जाधव यांनी प्रयत्न केले. सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्याला दर्जान्नती मिळवून देण्यास त्यांना यश आले. वास्तविक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर शासनाने त्यास तत्काळ निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. त्याचीही मागणी गेले दोन वर्षे ते मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे करीत आहेत. त्या अनुषंगाने या कामाची बजेट प्लेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठवली. तरीही शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे टाळले.

मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद झाली नाही म्हणून आ. जाधन यांनी या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी स्थानिक विकास निधीतून ३० लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी पुन्हा त्यांनी केली होती. परंतु, यावर्षीही ती डावलण्यात आली, यावर्षीच्या पावसात रस्ता अधिकच खराब झाला. वाहतू‌क बंद होईल, अशी अवस्था रस्त्याची झाली आहे, त्यामुळे या भागातील जनतेमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. त्यातूनच १५ ऑगस्ट रोजी रस्त्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे कळताच आ. जाधव यांनी स्वतः या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे जाहीर केले आहे. दुपारी १२ वाजता रामपूर-गुढे फाटा येथे हा रास्ता रोको होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow