रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे भूमीपूजन

Aug 16, 2024 - 14:41
 0
रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे भूमीपूजन
◼️ क्रूझ टर्मिनलसाठी 308 कोटी : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : विकासाची मुहूर्तमेढ तहसिल-प्रांत कार्यालयातून सुरु होते, कारण जमीन अदान-प्रदानाचे काम याठिकाणी चालते, असे सांगतानाच मा. मुख्यमंत्री महोदयांनी क्रूझ टर्मिनलसाठी 308 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
  
येथील अल्पबचत सभागृहाजवळ 5 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्रांताधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सा. बां. च्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
   
कोनशिला अनावरणानंतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले,  महसूल विभाग एका कुटुंबासारखे काम करतो.  माझ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांबाबत तक्रारी ऐकायला मिळत नाही. ही चांगली बाब आहे. 65 तलाठी कार्यालयांना 30 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 5 प्रांताधिकारी कार्यालयांसाठी 25 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.  या सर्व कार्यालयांमधून जनतेचे कामे झाली पाहिजेत. पोलीस पाटील, कोतवालांचे मानधन शासनाने वाढविले आहे. आपणही शासनाचा मान वाढवावा, असेही पालकमंत्री म्हणाले.  
     
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन करुन, ॲक्टीव्ह पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन, महसूल खात्याला आवश्यक साधनसामुग्री दिली असल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow