लांजा : कोत्रेवाडी 'डम्पिंग ग्राउंड प्रकल्प' रद्दऐवजी दिले वेगळे पत्र

Aug 17, 2024 - 10:37
Aug 17, 2024 - 12:41
 0
लांजा : कोत्रेवाडी 'डम्पिंग ग्राउंड प्रकल्प' रद्दऐवजी दिले वेगळे पत्र

लांजा : कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्प करण्यासंदर्भात कोत्रेवाडवासीयांच्या मागणीनुसार पत्र देण्याचे नायब तहसीलदारांसमोर कबूल करणाऱ्या लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी आवश्यक ते पत्र न दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी यांनी आपला शब्द फिरवून ग्रामस्थांची दिशाभूल करणारे दिलेले या ग्रामस्थांनी स्वीकारले नाही तर यापुढे यापेक्षा संधर्व तीव्र करताना होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छडले होते. उपोषणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष बापू जाधव जेष्ठ नेते महंमद रखांजी दाजी गडगिरे, बाबा धावणे त्याचप्रमाणे राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टये, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे आदींनी पाठिंबा दर्शवला होता. सकाळपासूनच कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. दुपार सत्रात मुख्याधिकारी हर्षला राणे, नायब तहसीलदार अजय गोसावी, पोलिस उपनिरीक्षक प्रयोग देसाई यांनी उपोषणकर्त्या कोरेवाडी ग्रामस्थांची भेट घेतली.

या वेळी मंगेश अधिकर म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागेचे भूसंपादन कसे केले? या प्रस्तावित प्रकल्पाकडे ती अधिकृत रस्ता नसताना जलस्त्रोत असताना आणि मंडळ अधिकारी यांनी असा प्रस्तावदेखील दिलेला असताना नगरपंचायतीकडून जबरदस्तीने हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या वेळी मुख्याधिकारी हर्षेला राणे यांनी सांगितले की, सदर भूसंपादनासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. कोणत्या दिवशी त्या जागेचे फेरसर्वेक्षण करण्यात आले? त्या फेर सर्वेक्षण कमिटीमध्ये कोण कोण होते? असे प्रश्न केले. त्याची सर्व कागदपत्रे आम्हाला द्या, अशी ग्रामस्थांनी मागणी ली असता मुख्याधिकारी यांनी मौन पाळले.

मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर गेलो नसल्याचे कबूल केले. त्याचा तुम्ही हा प्रकल्प रद करते, असे पत्र आम्हाला द्या. आम्ही आमचे उपोषण मागे घेतो, अशी भूमिका मांडली; मात्र प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार मला नाही, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. यावर ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र आमची मागणी आहे आणि तसेच पत्र आम्हाला द्या, अशी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली.

त्यावर मुख्याधिकारी यांनी ग्रामस्थांच्या मागण्यानुसार पत्र देण्याचे कबूल केले मात्र रात्री आठ वाजेपर्यंत मुख्याधिकारी उपोषणकर्त्यांकडे फिरकलेय नाहीत आठ वाजता अधिकारी अविराज पाटील हे नायब तहसीलदार यांच्या समवेत दाखल झाले आणि त्यांनी जुलै महिन्यातील संदर्भ पत्र दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत आम्हाला दुपारी मुख्याधिकारी यांनी सांगितलेल्या आश्वासनाप्रमाणे पत्र द्या, अशी मागणी केली.

संदर्भ पत्र दिले
मुख्याधिकारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता ग्रामस्थांनी आज तुम्ही आम्हाला दुपारी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पत्र द्या, अशी मागणी केली; मात्र मुख्याधिकारी यांनी तुम्हाला संदर्भ पत्र दिले आहे, असे सांगितले, मुख्याधिकारी यांनी आपले बोलणे फिरवत कोलांट उडी घेत दुपारी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पत्र न दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow