युवकांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाबाबत जनजागृती करावी : पद्मश्री कर्मवीर दादा इदाते

Aug 22, 2024 - 16:11
Aug 22, 2024 - 16:19
 0
युवकांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाबाबत जनजागृती करावी : पद्मश्री कर्मवीर दादा इदाते

मंडणगड : प्रचंड संघर्ष व रक्तरंजित अवस्थेतून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. तिरंगा हा शांतता, समृद्धी व एकात्मता यांचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेऊन महाविद्यालयीन युवकांनी आपले स्वातंत्र्य, भारतीय संविधान व तिरंगा याविषयी समाजामध्ये जनजागृती करावी व देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी केले.

ते येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित 'हर घर तिरंगा' अभियान कार्यक्रमातंर्गत 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व आणि आजचे संदर्भ' या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व आणि आजचे संदर्भ' या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या असंख्य वीरांनी आपले योगदान दिले आहे. भारतीय असंतोषांचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मौ मिळविणारचा हा मंत्र देशाला दिला. सामाजिक व सांस्कृतिक जागृतीसाठी त्यांनी शिवजयंती व गणोशोत्सवसारखे उपक्रम सुरू केले. १९५० पासून भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर खऱ्या अर्थाने आपला देश प्रजासत्ताक झाला. महाविद्यालयीन युवकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास व संविधानाचे महत्व समजून घेत यावाचत जनजागृती केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकेत 'हर घर तिरंगा 'या उपक्रमाची माहिती देवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 'हर घर तिरंगा' कार्यक्रमातंर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती असणाऱ्या भित्तीपत्रकाचे विमोचन संस्थेचे कोषाध्यक्ष रविंद्रकुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. विष्णु, जायभाये व डॉ. महेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले तर तांत्रिक सहायक म्हणून डॉ. सूरज बुलाखे व डॉ. दगडू जगताप यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश कुलकर्णी यांनी तर आभार डॉ. शामराव वाघमारे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:38 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow