कोकणातील लोककलांच्या राजाश्रयासाठी प्रयत्न करणार : प्रशांत यादव

Sep 12, 2024 - 14:02
 0
कोकणातील लोककलांच्या राजाश्रयासाठी प्रयत्न करणार : प्रशांत यादव

त्नागिरी : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी दिली.

संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण गावचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पश्चिम विभागाचे प्रभाग संघटक विजय करंबेळे यांनी शक्ती-तुऱ्याच्या जंगी सामन्याचे कासारकोळवण येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, कोकणातील लोककला कोकणच्या कलावंतांनी स्वत:च्या कलेच्या माध्यमातून टिकवून ठेवल्या आहेत. मात्र, या लोककलांना अजूनही राजाश्रय मिळालेला नाही. लोककलांना शासनाचे अनुदान मिळायला हवे. या लोककला सादर करणारे कलाकार आजही शासनाच्या मानधनापासून वंचित आहेत. त्यांना शासनाचे मानधन मिळणे गरजेचे आहे. या लोककलांना राजाश्रय मिळण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, कासारकोळवणच्या सरपंच मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर, मनसेचे तालुकाप्रमुख अनुराग कोचीरकर, राष्ट्रवादीचे देवरूख शहराध्यक्ष नीलेश भुवड, शिवसेनेचे (ठाकरे गट) मुन्ना थरवळ, गवळी समाज संघटना मुंबईचे अध्यक्ष अनंत भालेकर, संदीप गायकर, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते, अनंत खेडेकर, गणपत पंदेरे, सुरेश चाचे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नथुराम करंबेळे, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, अमित रेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी विजय करंबेळे यांनी मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.

कवी सचिन कदम आणि कवी विकास लांबोरे यांच्यातील शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले असा जाखडीचा सामना रंगला. जाखडी नृत्याचा या जंगी सामन्याचा परिसरातील जाखडीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow