गुहागर : तळवली आरोग्य केंद्रात बॉडी चेकअप मशिनद्वारे ९ महिन्यांत फक्त ५ रुग्णांची तपासणी

Aug 17, 2024 - 11:50
Aug 17, 2024 - 12:54
 0
गुहागर : तळवली आरोग्य केंद्रात बॉडी चेकअप  मशिनद्वारे  ९ महिन्यांत फक्त ५ रुग्णांची तपासणी

गुहागर : केंद्र सरकारने एवढा मोठा निधी खर्च करून आरोग्यवर्धिनी केंद्र बांधले आहे मात्र, जर यामधून रुग्णांना योग्य सेवा दिली जात नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे जर सर्वसामान्य जनतेला येथून योग्य सेवा मिळणार नसेल तर रुग्णांच्या जीवाशी उगाचच खेळू नका. योग्य सेवा देणार नसाल तर आरोग्यकेंद्राला टाळे लावा, असा इशारा गुहागर भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी तळवली आरोग्यवर्धिनी केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल कांबळे यांना दिला.

मागील काही दिवस या आरोग्यवर्धिनी केंद्रातून रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी मंगळवारी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट दिली. या ठिकाणी संपूर्ण बॉडी चेकअप करणारे साडेतीन लाख खर्चुन मशिन बसविण्यात आले आहे. गेल्या ९ महिन्यांत केवळ ५ पेशंट या मशिनद्वारे तपासले गेले आहेत. भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी डॉ. कांबळे यांना धारेवर धरले. डॉ. कांबळे यांनी मशिन चालवण्यास ऑपरेटर नाही, असे सांगितले. याबाबत कोणती लेखी तक्रार आपण जिल्ह्याला केली का? असा सवाल सुर्वे यांनी केला. 

आपण जबाबदार वैद्यकीय अधिकारी आहात; पण सर्वसामान्य जनतेला शासनाने दिलेल्या सुविधा देऊ शकत नसाल तर उपयोग काय? पेवे खरेकोंड येथील एका महिलेला उपचार करताना चुकीचे उपचार झाले. याबाबत देखील सुर्वे यांनी डॉ. कांबळेना त्यांची चूक निदर्शनास आणून पेशंटचा उपचाराचा खर्च वाढत गेल्यास तो खर्च तुम्ही करावा, असे सांगितले खर्च देण्यास डॉ. कांबळे यांनी मान्य केले आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यातून डॉ. गरूड हे येतात. या वेळी शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतले जातात. या वेळी सुरेश चौगुले, भाजप तालुका सरचिटणीस सचिन ओक, जिल्हा चिटणीस मंगेश जोशी, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, पेवेचे माजी उपसरपंच उमेश साळवी, गुरूनाथ कारेकर, मयुरेश भागवत व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:17 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow