चिपळूण : परशुरामनगर परिसरात पुराची नवी समस्या

Jul 16, 2024 - 12:16
 0
चिपळूण : परशुरामनगर परिसरात पुराची नवी समस्या

चिपळूण : ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गेच्या गटारांमध्ये न गेल्याने रविवारी परशुरामनगरमधील दुकान, घरांतून पाणी शिरले. महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे परशुरामनगर परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे हो समस्या भेडसावत असताना त्यावर महामार्ग विभाग कोणत्याही उपाययोजना करत नाही. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे येथील नागरिकांच्या समस्येत नवीन भर पडली आहे.

चिपळूण शहारातील मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल अभिरुची शेजारी असणाऱ्या पोंक्षे घराशेजारील छोटा नाला आहे. येथून मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावर येत आहे. हेच पाणी हळूहळू महामार्गाच्या सिमेंट कॉक्रिट गटारात जाते, पण हे पाणी त्या गटारात जाईपर्यंत महामार्गावर नदी तयार होते. तसेच ओझारवाडीतील कांबळी घराशेजारील पऱ्याही महामार्ग गटाराला जोडला तर उमेश सकपाळ यांच्या कार्यालयासमोर पाण्याची नदी वाहणार नाही. या सर्वांचा फटका परशुराम नगरमधील रहिवाशांता होत आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर प्रशांत बुक डेपो परिसरात जलद पाणी भरते. रविवारी झालेल्या पावसात प्रतीक आवास सोसायटीमध्ये पायरीला पाणी लागले होते. तेथील एका सोसायटीची विहीर पूर्ण चिखलाने भरली, तसेच परकार चाळीच्या मार्गावर पूर्ण नदी तयार झाली. त्यामुळे खेडेकर रेशन दुकानाकडे नागरिक जाऊ शकत नव्हते.

महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचत आहे. महामार्गाच्या लगतच्या भागात ही समस्या अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यावर महामार्ग विभागाने मार्ग काढला पाहिजे. ओझरवाडी येथील डोंगरातून येणारे पाणी गटारात घेतले तर पुराच्या पाण्याची समस्या कमी होईल. - शशिकांत मोदी, माजी नगरसेवक, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow