4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा; शरद पवार यांचे आव्हान

Aug 17, 2024 - 12:50
Aug 17, 2024 - 12:58
 0
4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा; शरद पवार यांचे आव्हान

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वतंत्र दिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी देशात वन नेशन, वन इलेक्शन असेल, अशी घोषणा केली होती.

मात्र काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभेची निवडणूक (Assembly Election 2024) जाहीर केलीय. हे सरकार देशात अद्याप चार राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. त्यांनी म्हटल्या प्रमाणे 4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असे थेट आव्हान शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला केलं आहे.

म्हटल्याप्रमाणे 4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे काल केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यात साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार, हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. ते नागपूर विमानतळावर आले असता ते बोलत होते.

लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 17 ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा हा विदर्भ दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार हे प्रथमच वर्ध्याच्या (Wardha News) दौऱ्यावर असणार आहे. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाला शरद पवार वर्ध्यात येत आहे. यावेळी याच कार्यक्रमाला भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने सर्वांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:27 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow