पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

Aug 17, 2024 - 13:56
 0
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

पालघर : जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये ३.६ रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी साडेसहा वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पालघरमध्ये ६ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्काे बसले. पालघरच्या डहाणू , कसा, गांजड आणि इतर परिसरामध्ये सकाळी ६ वाजून ३५ मिनिटे ४१ सेकंदांनी भूकंपाचे धक्के बसले असून त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. हे धक्के १० किलोमीटर खाली होते, तर १९.८७ अक्षांश आणि ७२.७६ रेखांश दिशेला तसेच मुंबई व नाशिक आणि गुजरातमधील वापीपासून हा भूकंपाचा केंद्र बिंदू जवळ होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे,

पालघर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे काही घरांना हादरे बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 17-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow