चिपळूण : कुणबी समाजाला उमेदवारी मिळावी : कुणबी समाजोन्न्ती संघ

Aug 17, 2024 - 11:17
Aug 17, 2024 - 14:22
 0
चिपळूण : कुणबी समाजाला उमेदवारी मिळावी : कुणबी समाजोन्न्ती संघ

चिपळूण : कुणबी समाजाचे राजकीय अस्तित्व नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटत आहे. याची जाणीव झाल्यामुळे आता जो राजकीय पक्ष या विधानसभेसाठी कुणबी समाजाता उमेदवारी देईल त्या पक्षाच्या मागे समाज ठामपणे उभा राहील, असे कुणबी समाजोन्न्ती संघ मुंबई शाखा चिपळूण ग्रामीणच्या बैठकीत ठरवण्यात आले. कुणबी समाजोन्न्ती संघ मुंबईच्या चिपळूण ग्रामीण शाखेची मासिक सभा खेड येथील स्व. माधवराव बाईत वस्तीगृहात पार पडली. या सभेला प्रदीप उदेग, भरत उदेग, भाई कुळे, संजय जावो आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कुणबी समाजाचे राजकीय अस्तित्वाबाबत चर्चा करण्यात आली.

गेली अनेक वर्षे राजकीय पटलावरती कुणबी समाजाचे अस्तित्व शून्य आहे. कुणबी समाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुसंख्येने आहे. या समाजाकडे राजकीय पक्ष जाणूबुजून दुर्लक्ष करतात. कुणबी समाजाची मते मिळवण्यासाठी समाजातील पुढाऱ्यांना हाताशी धरत मते मिवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा व इतर निवडणुकीत फक्त कुणबी समाजाचा वापर केला जातो. आता कुणबी समाजातमुद्धा मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृतीबरोबर राजकीय जागृतीसुद्धा होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी कुणबी समाज एकत्रितपणे आक्रमक होत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष समाजातील व्यक्तीला उमेदवारी देईल त्या राजकीय पक्षाच्यामागे चिपळूण तालुक्यातील समाज उभा राहील मात्र राजकीय पक्षांनी कुणबी समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी संधी देणे गरजेचे आहे. ज्या ज्या पक्षात कुणबी बांधव कार्यरत आहेत त्यांनी आपल्या राजकीय पक्षाकडे उमेदवारीमाती मागणी करावी, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow