रत्नागिरी : खुल्या प्रवर्गातील उद्योजकांसाठी उद्या मठ येथे कार्यशाळा

Aug 17, 2024 - 14:16
 0
रत्नागिरी : खुल्या प्रवर्गातील उद्योजकांसाठी उद्या मठ येथे कार्यशाळा

त्नागिरी : खुल्या प्रवर्गातील उद्योजकांसाठी असलेल्या अमृत योजनेविषयी माहिती देण्यासाठी येत्या रविवारी (दि. १८ ऑगस्ट) रोजी मठ (ता. लांजा) येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील १८ ते ५५ या वयोगटातील ज्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करणे, प्रशिक्षण घेणे तसेच भांडवलाची आवश्यकता असेल आणि ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत आहे, त्यांच्यासाठी अमृत योजना आखण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांकरिता तसेच इतर उमेदवारांसाठी इतर उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात येऊन इतर माध्यमातूनही विद्यार्थी, तरुणांचा विकास घडवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (Academy of Maharashtra Research, upliftment and Tarining) या नावाने नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे. या योजनेतून सीबिल स्कोअर आणि प्रकल्प अहवालानुसार बँकेमार्फत कर्जपुरवठा केला जाईल. लाभार्थ्याला अमृतकडून राष्ट्रीयीकृत बँक निकषानुसार कर्जाच्या व्याजाचा परतावा केला जाईल.

या योजनेची माहिती व्हावी, यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अमृत संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्हा समन्वयक शैलेश मराठे मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी सायंकाळी ४ वाजता मठ येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रेयस मुळ्ये (9405917567), उमेश आंबर्डेकर (9850082437), राजू नेवाळकर (9270963574) किंवा सुधाकर चांदोरकर (9422646765) यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow