आयएएस, आयपीएस बनून मंडणगडचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा : रमेश घडवले

Aug 17, 2024 - 10:52
Aug 17, 2024 - 15:02
 0
आयएएस, आयपीएस बनून मंडणगडचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा : रमेश घडवले

मंडणगड  : विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तनि अभ्यास करून आयएएस, आयपीएस अधिकारी बनून मंडणगडचे स्वप्न पूर्ण करावे त्यासाठी मंडणगड तालुका कुणबी सेवासंघात सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन निवृत्त पोलिस अधिकारी रमेश घडवले यांनी केले.

सेवासंघ यांच्यावतीने नालासोपारा येथे आयोजित विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ६५ वर्षांची परंपरा असणारा दहावी, बारावी, पदवीधर, शिष्यवृत्ती व विविध क्षेत्रातील परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी सभापती भाई पोस्टुरे, मनोज घागरूम, मारूती पालणकर, संजय मनवे, रघुनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घागरूम यांनी केले. या वेळी पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे, आयआयटी पवईचे अधिकारी मुरलीधर बैंकर, अॅड. समिधा सापटे, भाई पोस्टुरे, रघुनाथ पोस्टुरे, मारूती पालणकर, अनंत काप, सचिन माळी यांनी विविध क्षेत्रांच्या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी कुणबी सेवासंघ मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रेश्मा डेरे यांची तर कुणबी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील शिगवण यांची निवड करण्यात आली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow