गुहागर : पावसामुळे बेलदूर नवानगरमध्ये घराचे नुकसान

Aug 26, 2024 - 10:28
Aug 26, 2024 - 10:32
 0
गुहागर : पावसामुळे बेलदूर नवानगरमध्ये घराचे नुकसान

गुहागर : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली. मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील बेलदूर नवानगर येथे घरावर बांध कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

नवानगर येथील रणजीत रमेश आंबेरकर यांच्या मालकीचा जागेचा बांध हा गोपाळ सजण्या शिरगावकर यांच्या घरावर पडला आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow