Ladki Bahin Yojana : आधार क्रमांक बँकेशी कसा लिंक करायचा? जाणून घ्या...

Aug 17, 2024 - 15:37
Aug 17, 2024 - 16:11
 0
Ladki Bahin Yojana : आधार क्रमांक बँकेशी कसा लिंक करायचा? जाणून घ्या...

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

अजूनही रोज अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. मात्र बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे? हे जाणून घेऊ या...

सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुया. हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.

1. त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar
2. आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
3. आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचं आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल.
4. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येआल तो टाका.
5. ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात.
6. आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
7. आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा.
8. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.

आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया?

1. सर्वात आधी तुम्हाला गुगल NPCI असं सर्च करायचं आहे.
2. त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला NPCI चे अधिकृत संकेतस्थळ दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. आता तुम्हाला consumer या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
4. त्यानंतर Bharat Aadhar Seeding या ऑप्शन वरती क्लिक करायचं.
5. आता तुमच्यासमोर आणखी नवे पेज येईल. त्यावर आधार क्रमांक टाका. खाली Request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करा.
6. त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आहे आणि खाली fresh seeding वर क्लिक करायचे आहे.
7. बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
8. टर्म्स अँड कंडिशन्सना वाचून त्यांचा स्वीकार करायचं आहे. त्यानंतर कॅपचा कोड आला असेल तो भरा आणि सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक करू शकता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow