बाहुल्यांना 'बोलते' करणाऱ्या कृष्णाजी श्रीराम गोडेंचा आंतरराष्ट्रीय सन्मान

Aug 17, 2024 - 15:31
 0
बाहुल्यांना 'बोलते' करणाऱ्या कृष्णाजी श्रीराम गोडेंचा आंतरराष्ट्रीय सन्मान

साखरपा : शब्दभ्रम ही कला जोपासत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारे कलाकार कृष्णाजी श्रीराम गोडे यांच्या सन्मानात आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मानाची भर पडली आहे. व्हेंट हेवन म्युझियमकडून गोडे यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

गोडे हे मूळचे भडकंबा गावाचे ग्रामस्थ, सध्या ते देवरूख इथे वास्तव्यास आहेत. गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये असताना गोडे यांना जादूकलेची ओळख आणि आवड निर्माण झाली. त्या दरम्यान गोडे यांना बोलक्या बाहुल्यांनी आकर्षित केले. बोलक्या बाहुल्या या केवळ इंग्लंडमधेच तयार होत असत. १९८७ ला गोडे यांनी इंग्लंडहून पहिली बाहुली डेव्हनपोर्ट इयून ८५० रुपयांचे कर्ज काढून विकत घेतली. त्या काळात युरोपमध्ये गाजत असलेला क्लोड केनी हा कलाकार त्यांचा मित्र होता. त्याचा अँडी या बाहुल्यावरून गोडे यांनी स्वतःच्या बाहुल्यांची मापे तयार करून त्याच वर्षी स्वतःचा पहिला बोलका बाहुला तयार केला. त्याच दरम्यान आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन या अर्कचित्राचा गोडे यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांनी प्रयत्नपूर्वक कॉमन मॅनचा मुखवटा तयार केला. इतकेच नाही तर कॉमन मॅनच्या बाहुल्याला आवाज दिला, लक्ष्मण यांच्या अर्कचित्रात कायम अबोत राहिलेल्या कॉमन मॅनला प्रथम आवाज दिला तो गोडे यांनी. गोडे यांच्या या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत नॉर्थ अमेरिका असोसिएशन ऑफ व्हॅट्रिलॉकिस्ट या संस्थेने त्यांना सभासद करून घेतले. संस्थेच्या न्यूज इव्हेंट या द्वैमासिकात गोडे यांच्या सगळ्या बाहुल्यांचे फोटो प्रसिद्ध केले. मॅजेस्टिक प्रकाशनांकडून शब्दभ्रम शास्त्र आणि कला हे पुस्तक १९८३ला प्रसिद्ध करण्यात आते. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या बाहुल्यांची नोंद १९९७ हा करण्यात आली आहे तसेच त्यांना २००४ला लाईफटाइम अचिव्हमेंट सन्मानही देण्यात आता आहे. गोडे यांनी तयार केलेला एक बाहुला सिनसिनाटी येथील व्हॅट हेव्हन मुझियममध्ये मानाने ठेवण्यात आला आहे. याच व्हेंट हेव्हन म्युझियमने गोडे यांचा आणखी एक सन्मान नुकताच केला आहे.

शब्दभ्रम या कलेला आयुष्य समर्पित केले. कलाकारांनी कामाची दखल घेतली. आता व्हेंट हेव्हन म्युझियमतर्फे सन्मान करण्यात आला आहे. खूप समाधानाचा हा क्षण आहे. - कृष्णाजी गोडे, शब्दभ्रम कलाकार


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow