तरुणीची छेडप्रकरणी देवरूखमध्ये एकजण ताब्यात

Aug 19, 2024 - 10:01
Aug 19, 2024 - 10:39
 0
तरुणीची छेडप्रकरणी देवरूखमध्ये एकजण ताब्यात

संगमेश्वर  : देवरूख येथे एका दुकानात काम करणाऱ्या मुलीला छेडण्याचा एकाने प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने प्रसंगावधान दाखवून पोलिस आणि आगार व्यवस्थापकांकडे धाव घेतल्याने त्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

देवरूख येथे रविवारी आठवडा बाजार भरतो. या गदींचा गैरफायदा घेत काही विकृत व्यक्ती चोरी व महिलांची छेडछाड करत असतात. असाच प्रकार एका दुकानात काम करणाऱ्या युवतीसमवेत घडला. ग्राहक बनून आलेल्या व्यक्तीने तरुणीची छेड काढून धूम ठोकली. मात्र दक्ष तरुणीने दुकानात काम करणाऱ्या एका युवकाच्या साहाय्याने त्याला स्थानक परिसरात गाठले. तेथे वादावादी सुरू असताना आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना पाचारण केले. पीडित तरुणाने दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज दाखवले असता पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 8/19/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow