देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे

Aug 20, 2024 - 11:04
 0
देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे

साडवली : देवरूख ग्रामीण रुग्णालय अद्ययावत व्हावे ही तालुकावासीयांची अनेक वर्षांची मागणी होती. त्यानुसार निधी मंजूरही झाला. नव्या आराखड्याप्रमाणे २०१९ पासून ग्रामीण रुग्णालय नव्या स्वरूपात उभे राहिले. आतापर्यंत ९० टक्के कामही पूर्ण झाले असून येत्या दहा दिवसांत आतील फर्निचर व पाण्याची टाकी उपलब्ध झाल्यास ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात त्या नवीन इमारतीचे उ‌द्घाटन केले जाईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेमध्ये नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांना आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संदीप माने यांनी उत्तर दिले तसेच आमसभेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम यांनी आरोग्य विभागाकडे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा विषय पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडून पुढील कार्यवाही करू, असेही त्यांना सांगितले. देवरूख ग्रामीण रुग्णालयाला ३० बेड मंजूर आहेत. ३० बेडचे रुग्णालय असताना केवळ चार बेड उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णाची संख्या वाढली तर रत्नागिरी अथवा संगमेश्वर येथे रुग्णाला घेऊन जावे लागते. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या रुग्णालयासाठी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत; परंतु यातील दोन पदे भरण्यात आली आहेत तर एक रिक्त आहे. यातील एक डॉक्टर प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे रुग्ण तपासणी करण्याची जबबादारी आहे. दिवसाला रुग्णालयात ८० ते ९० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. येथील ३ पदे त्वरित भरणे गरजेचे आहे. आरोग्य विभागातील उणीव आमसभेत मांडण्यात आली. बावर आमदार निकम यांनी सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. लवकरच या सर्व कामांना गती येऊन नूतन इमारतीत रुग्णसेवा सुरू करण्यात येईल, असा दिलासा त्यांनी दिला.

उपजिल्हा रुग्णालय बनवण्यासाठी प्रयत्न
देवरूख ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या पद्धतीने नवीन इमारतीची रचना करण्यात आली आहे. संगमेश्वर येथील ट्रामा केअर सेंटरमध्येही सुधारणा करण्याबाबत व सुविधा उपलब्ध करण्याबाबत आमसभेत चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याला आवश्यक निधी देऊ, असे आमदार निकम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow