विधानसभेत तेली समाजाला दहा टक्के उमेदवारी देण्याची मागणी

Aug 20, 2024 - 10:06
Aug 20, 2024 - 11:00
 0
विधानसभेत तेली समाजाला दहा टक्के उमेदवारी देण्याची मागणी

रत्नागिरी : येत्या विधानसभेसह प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीसाठी तेली समाजाला दहा टक्के उमेदवारी मिळाली पाहिजे. राज्यात १ कोटीपेक्षा अधिक तैली समाज आहे. उमेदवारी मिळाली नाही तर समाजबांधव टोकाची भूमिका घेतील, असे प्रतिपादन प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस आणि महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी केले. राज्य संघटनेची कार्यकारिणीची सभा रविवारी मुंबईत आमदार निवासात घेण्यात आली. 

या सभेला प्रामुख्याने भाजप प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गजानन शेलार, सहसचिव बळवंत मोरघाडे, अशोक व्यवहारे आदी हजर होते. ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत पोटजातींसह ११ टक्के तेली समाज असूनही फक्त एकच उमेदवार दिला गेला, मराठा- कुणबी-ओबीसी असा भेद निर्माण करून ती जागा जाणूनबुजून पाडण्यात आली आणि समाज संघटना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. गलिच्छ राजकारणामुळे प्रत्येक वेळेस, प्रत्येक प्रस्थापित पक्ष तेली समाजाला गृहित धरून फक्त मतदानासाठी उपयोग करून घेतो, अशी भावना प्रत्येक तेली समाजाच्या बांधवांमध्ये निर्माण झालो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेली समाजाला जाणूनबुजून डावलले जात आहे. त्याची खंत प्रत्येकाने व्यक्त केली म्हणून संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी सभेत जो पक्ष १० टक्के तेली समाजाला उमेदवारीच्या निमित्ताने प्रतिनिधित्व देईल त्या पक्षाबाबत किंवा त्याच पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा घेईल. राज्यात विधानसभेसाठी तेली समाजासाठी जवळपास २० ते २२ उमेदवारी विविध पक्षांकडे मागणी केली जाईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तेली समाजाला १० टक्के जागा न मिळाल्यास तेली समाज योग्य भूमिका घेईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow